एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यातील खडकेसीम माध्यमिक विद्यालयात आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला. शनिवार हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यादिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तराविना शाळेत बोलवुन शाळेत खडूविना, फळाविना, कवायत घेण्यात आल्या. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळवण्यात आले. यावेळी ‘मी कलेक्टर झालो तर’ हा निबंध इ१०वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच श्रावण महीन्याबद्दल विद्यार्थ्यांना मिनाक्षी पाटील यानीं मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेत विद्यार्थी कसा असावा व जिवनात शिस्तीचे महत्व मुख्याध्यापक राजेंद्र टी. पाटील यानीं पटवुन दिले. डि.बी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार एम.ए. पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.या आगळ्या वेगवेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.