वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन दिवसांपुर्वीत तीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार केल्याची घटना ताजी असतांना वरणगाव शहरात राहणाऱ्या एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील एका भागात शाळकरी मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता शाळकरी मुलगी ही शाळेत जात असताना संशयित आरोपी निलेश राखुंडे यांनी तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यामध्ये थांबवत माझ्याशी पाच मिनिटात बोल असे सांगून तिला लाजत उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार झाल्यानंतर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश राखुंडे यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुकर भालशंकर करीत आहे.