जळगाव (प्रतिनिधी)। प्रगती विद्यामंदिर शाळेत आज राष्ट्रीय क्रीडादिन ‘गूगल मीट’च्या माध्यमातून ऑनलाईन साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन, नियोजन तसेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन क्रीडाशिक्षक रमेश ससाणे यांनी केले.
मेजर ध्यानचंद यांच्या अद्वितीय खेळामुळे भारताचे नाव त्यांनी हॉकी या खेळात सुवर्णाक्षरांनी कोरले. यामुळे केंद्र शासनाच्या आदेशानुसार त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आज या लॉकडाउन च्या काळात विद्यार्थी जरी शाळेत नसले तरी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त माहिती मिळावी म्हणून प्रगती विद्यामंदिर शाळेत गूगल मीट या अँपद्वारे ऑनलाईन माहिती देण्यात आली. क्रीडादिनानिमित्त संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी क्रीडादिनानिमित्त विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मुख्याध्यपिका संगीता गोहिल, शिक्षक संध्या अट्रावलकर, मनोज भालेराव, पंकज नन्नवरे, नम्रता पवार, अविदिप पवार,सारिका तडवी, अलका करनकर, विजया पाटील, नेहा क्षीरसागर, नीलिमा पाटील, रत्नप्रभा पवार, सोनल चौधरी, उज्वला दंडवते इ उपस्थित केले.