पालघर (वृत्तसंस्था) येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला झालेल्या अपघातात १९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील चार विद्यार्थी आणि बसचालक गंभीर जखमी आहेत. हा अपघात माहीमजवळील पाणेरी नदीजवळ झाला. चालकाचे नियंत्रण सुटून बस झाडावर आदळल्याचे वृत्त आहे.
सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातात ४ विद्यार्थी आणि चालक गंभीर जखमी झाले असून, १५ विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन विद्यार्थ्यांना ढवळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली.