जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहुर परिसरात चार चोरट्यांनी धुमाकुळ घालत दमदाटी करत एकाच्या पाठीवर चाकूने वार करून रोख रकमेसह मुद्देमाल चोरून देण्याची खळबळजनक घटना बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकारे पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहुर शिवारामध्ये अज्ञात ४ चोरट्यांनी ३ ठिकाणी जबरी चोरीची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत समाधान शेनफडू तरवाडे (वय-४८) हे पहूर शिवारातील शेतात असताना या चार जणांनी त्यांचा रस्ता अडून खिशातील ६ हजारांची रोकड काढून घेतली. दुसऱ्या घटनेत रस्त्यावरील आयशर ट्रक क्रमांक (आरजे ११ जीसी ५०२३) हा अडून चालक जितेन रामस्वरूप धाकड रा. मध्य प्रदेश याच्या पाठीवर चाकूने वार करून त्याच्या खिशातील १८ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर याच चोरट्यांनी पाळधी गावातील बंद घराचे दरवाजा तोडून आज प्रवेश करत चोरी केली. तर चौथ्या घटनेमध्ये पहूर येथील येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम मधील बॅटरी तोडून नुकसान केले आहे. दरम्यान या चारही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात समाधान तरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहुर पोलीस ठाण्यात आज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप करीत आहे.