नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकमध्ये केलेल्या घोटाळ्यांनंतर पुन्हा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने नुकताच भूषण पॉवर आणि स्टील लिमिटेड (बीपीएसएल) ने ३,८०० करोड रुपयांचा केलेल्या घोटाळ्याचा शोध घेतला आहे.
या संदर्भात ‘अमर उजाला’मध्ये या संदर्भात वृत्त प्रकाशित वृत्तात म्हटले आहे की,पीएनबीने या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरआयबी) ला महिती दिली आहे. या संदर्भात पीएनबीने म्हटले आहे की, भूषण पॉवर आणि स्टील लिमिटेडने बँकेच्या कर्जाचा धोकाधडी केली. तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जाबाबत आपल्या अकाऊन्टमध्ये गडबडी केली आहे.
पीएनबीने या घोटाळयाबाबत शेअर बाजारालाही माहिती दिली आहे. फॉरेंसिंक ऑडीट तपासणी आणि स्वतः पुढाकार घेत त्यांच्या संचालकांविरुद्ध सीबीआयच्या प्राथमिक माहितीच्या आधारावर बँकेने आरबीआईला 3,805.15 करोड रुपयाची धोकाधडीची एक रिपोर्ट दिली आहे. पीएनबीने म्हटले आहे की, संबंधित कंपनीने बँकेने दिलेल्या कर्जाबाबत आपल्या ऑडीटमध्ये फेरफार केली आहे. सध्या हे प्रकरण एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी विधी न्यायधीकरण) च्या ठिकाणी चौकशीत सरकार फार पुढे सरकले आहेत. दुसरीकडे बँक चांगल्या वसुलीचीअपेक्षा केली जात आहे.