सावदा प्रतिनिधी । येथील स्वातंत्र सेनानी शंकर महाजन यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. बुधवारी पाचव्या दिवशी उत्तरकार्य विधी वेळी महाजन परीवाराने स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवून अनोखी श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी स्मशानभूमीतील केस जमा केले, बसण्याच्या पायऱ्य स्वच्छ केले, दहावे अंत्यविधीचा मंडप गृह झाडून चकाचक केला. भिंतीवर साठलेली भस्म राख साफ केले. यावेळी महाजन परीवारासह एमएसईबीचे सेवानिवृत्त कर्मचारी एच.के.पाटील, विजय महाजन, दिलीप महाजन, अनिल महाजन, डॉ. अनिल महाजन, डॉ. अमित महाजन, डॉ. तुषार पाटील, एच.के.पाटील, ॲड. राकेश पाटील, पंकज कुरकुरे, प्रशांत वाघुळदे आदी सहभागी झाले होते.
शंकर अप्पा महाजन यांचे पश्चात तीन मुले एक मुलगी व नातवंडे पणत्या, पणतू असा परीवार आहे. सावदा येथे ते स्टॅम्पचे काम करायचे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या जीवनाची सुरूवात केली. नंतर तलाठी म्हणून ते काम करू लागले. या नोकरीत त्यांचा महसूल विभागाच्या कलमांशी घनिष्ठ गाढा सबंध झाला होता. अनेक अधिकारी महसूलशी संबंधित विषयांची त्यांच्याशी चर्चा करायचे. सावदा व पंचक्रोशीत तब्येतीने अत्यंत तंदुरुस्त अशीही त्यांची ख्याती होती. विविध विषयांवर त्यांचा दांडगा अभ्यास होता. दुबार काष्टा चापून चोपून नेवलेलेधोतर, पांढरा फुलबाह्यांचा अंगरखा पाठीचा कणा ताठ, डोक्यावर पांढरी टोकदार टोपी अशी त्यांची सदा वेषभूषा असे. नाकासमोर ताठ चालणे, खोटे न बोलणे, दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या अप्पा यांनी स्व खर्चातुन सावदा येथे हनुमान शिव-दत्त- शनी मंदिर बांधकाम केले होते तसेच मुक्ताईनगर तालुक्यात धाबेपिंप्री महालक्ष्मी मंदीर, केऱ्हाळा येथे श्रीकृष्ण मंदीर, खिर्डी विठठल मंदीर ,त्यांनी त्यांचे कर्की जन्म गावीही विविध देवतांची मंदीरे बांधली, वा मोठया प्रमाणावर आर्थिक मदत केलेली आहे.
शनिवारी सावदा येथील वैकुंठ धाम येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे कनिष्ठपुत्र अनिल महाजन यांनी मुखाग्नी डाग दिला. यावेळी शासनातर्फे फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पुष्पचक्र वाहून शासकीय मानवंदना दिली. रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे यांनी परीवाराचे सांत्वन केले. पोलीस दलातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, रावेर उपनिरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि राहुल वाघ व पोलीस सहकारी यांनी पोलीस मानवंदना दिली.