यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना बेशिस्त वागणुकीमुळे निलंबीत तर किनगावचे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत सपकाळे यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याने पंचायत समितीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी या संदर्भात दिलेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मकरंद सैदाणे यांना वारंवार सुचना करून देखील बैठकीस उपस्थित न राहणे दफ्तर तपासणी व बेशिस्त आणी शासकीय कामात दिरंगाई करणे अशा वागणुकीबद्दल निलंबीत करण्यात आले . किनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत सपकाळे यांना देखील याच कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहीती दिली आहे . गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन गटविकास अधिकारी यांनी केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत असुन , तालुक्यात झालेल्या रोजगार हमी योजनेचे भ्रष्ठाचार , १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीत झालेले निकृष्ठ कामांचे गोंधळ व गोठ्यांच्या बोगस लाभार्थी प्रकरणी देखील अशाच प्रकारची निष्पक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे.