Home क्राईम सावखेडा बुद्रुक येथील महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी; एकावर गुन्हा

सावखेडा बुद्रुक येथील महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी; एकावर गुन्हा

0
32

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा बुद्रूक येथे मागील भांडणाच्या कारणावरून महिलेला काठीने बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सावखेडा बुद्रूक येथे धनराज भगवान पाटील हे पत्नी देवयानी व मुलगा रुद्र या कुटुंबासह वास्तव्यास आहे. बुधवारी २३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास देवयानी हा मुलगा रुद्र याच्यासोबत घराच्या अंगणात बसलेले असताना याठिकाणी पिंप्राळा येथील रहिवासी फैसल खान असलम खान आला. मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी लाकडी काठीने देवयानी यांच्या उजव्या पायावर व तोंडावर डाव्या बाजुला मारहाण केली तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत देवयानी या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी देवयानी यांचे पती धनराज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी २४ मार्च रोजी फैजल खान असलम खान रा. पिंप्राळा रा.जळगाव याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सतीश हाळनोर हे करीत आहेत.


Protected Content

Play sound