वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीमाई फुले यांचा जयंती उत्साहात

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील प्राथमिक, माध्यमिक,जुनिअर कॉलेजला सावित्री माई फुले यांचा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा झाला.

यावेळी सावित्री माई फुले यांचा हुबेहूब सजीव देखावा करून घोड्यावर ढोल ताशाच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सावित्री माई फुले जन्मोत्सवात शाळेच्या विध्यार्थिनींनी साडी, डोक्यावर फेटा परिधान करीत ढोल ताशाच्या गजरात लेझिमवर ठेका धरला. गावातील प्रत्येक चौकात सावित्री माई फुले महिला मुक्तीच्या खऱ्या जनक असल्याचा घोषणा देत मुलींनी नाटीका सादर केल्या. यावेळी गावात या मिरवणुकीने आबाल वृद्ध यांचे लक्ष  वेधून घेतले होते. पुजा जाधव या  विध्यार्थिनींने सावीत्रीमाईची भूमिका सादर करून जीवन पट सांगितला.

याप्रसंगी मुख्याध्यापक सोपान पाटील, प्राचार्य जी. एस. पाटील, जेष्ठ शिक्षक, एस. जे. भामरे, श्रीमती एल. एस पाटील, पी. व्ही. पाटील, भाग्यश्री गोसावी यांनी प्रतिमा पूजन केले.शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर बांधव यांनी महिला दिनी स्तुत्य उपक्रम राबविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार पी एच निकुंभे सर यांनी मानले.

Protected Content