रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आभोडा येथील शाळेचे मुख्याध्यापक दिलीप पाटील यांना सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री.दिपक केसरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, कौशल्य विकास व उद्योजगता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आय.ए.कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.आजपर्यंत समर्पण भावनेने केलेल्या सेवेचे हे फळच म्हणावे लागेल.
कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता आपण आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजावत राहावे.आपल्याला त्याचे चांगले फळ आपल्या जीवनात मिळतेच.असे भावनोद्गार सरांनी काढले.याप्रसंगी उपस्थित जिल्हा भरातील सर्व मित्रपरिवाराकडून दिलीप पाटील सरांना शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.