खडसे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम आभासी पद्धतीने संपन्न करण्यात आला.

सुरूवातीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमा पूज प्र.प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रा.डॉ.संबोधी देशपांडे भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा याचे “महिलांच्या विकासामधील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान” या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान आभासी पद्धतीने आयोजित केलेले होते. त्यात त्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच आज स्त्री किती कणखर असली पाहिजे व तिने काय केले पाहिजे यासंदर्भात अतिशय मुद्देसूद विवेचन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा इतिहास श्रोत्यांसमोर ठेवला. कार्यक्रमास विशेष उपस्थिती उप-प्राचार्य डॉ.ए. पी.पाटील तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.डांगे ,रासेयो सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बाविस्कर तसेच महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ठिगळे यांची होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा.डॉ.प्रतिभा ढाके यांनी तर प्रास्ताविक व प्रमुख वक्त्याचा परिचय तसेच आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संजीव साळवे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू – भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी / विद्यार्थिनी यांची भरपूर उपस्थिती लाभली.

 

 

Protected Content