ड्युरा सिलेंडरसाठी पोलिसांतर्फे मदत

सावदा ता, रावेर प्रतिनिधी । रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात ड्युरा सिलेंडर उपलब्ध व्हावे यासाठी पोलिसांतर्फे मदत करण्यात आली आहे.

रावेर ग्रामीण रूग्णालयात डयुरा ऑक्सिजन सिलेंडर उभारण्यासाठी लोकसहभागाचे स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडून मदतीसाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उत्तम प्रतिसाद देत असून रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि स्वप्निल उनवणे, योगेश शिंदे, चालक सादिक शेख, अश्रफ शेख, वराडे, स्वप्निल पाटील, अब्बास तडवी, आणि सर्व पोलीस अंमलदार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ड्यरा सिलेंडरसाठी मदतीचा हात दिला आहे.

आज सर्व देशभर कोरोनाचा कहर वाढतोय सर्व सामान्य कोरोना बांधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज अत्यावश्यक झाली आहे म्हणून सदर जाहीर मदतीच्या आवाहनाला निंभोरा पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी यांनी एकूण १३०००/- रुपयांची अमुल्य देणगी देवून समाजातील इतर सर्वांसमोर एक उत्तम विधेयबक कार्याचे उदाहरण ठेवले आहे, यामुळे निभोरा पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे सह त्यांच्या पोलिस अधिकारी यांचें सर्व समाजातून कौतुक होत आहे.

Protected Content