सावदा, ता. रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात विविध विकासकामांना निधी आणणारे आमदार चंद्रकांत पाटील यांचा येथील नगरपरिषदेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. राजेश वानखेडे यांनी याबाबाचा प्रस्ताव मांडला होता.
नगर परिषदेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा सौ.रेणुका राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत विविध विकासकामांवरती व शहराच्या पुढील कार्यभारासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली असता. यावेळी सावदा शहराच्या विकास कामांमध्ये गेल्या कार्यकाळात मोलाची साथ म्हणून ज्याचं योगदान राहिलं ते मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान कार्यसम्राट आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी जे भरभरून निधी या शहराच्या विकासासाठी आणला त्यामध्ये प्रामुख्याने ख्वाजा नगर,सोमेश्वर नगर, हद्दीबाहेरील परिसर, त्यासोबत विविध समाजाची सामाजिक भवने, पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ यासह अनेक कामे सांगता येतील. अशा कामांची वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले.

या कामात चंद्रकांतभाऊ पाटील यांनी स्वतःला झोकून देऊन या शहराचा काय पालट करण्यासाठी नक्कीच पुरेपूर प्रयत्न केले आहे त्यामुळे त्यांचजाहीर आभार व अभिनंदनाचा प्रस्ताव माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे गट नेते राजेश वानखेडे. यांनी मांडला तर आगामी काळात आमदार महोदय यांचा सावदा शहराच्या वतीने नागरी सत्काराचा कार्यक्रम नगरपालिकेच्या वतीने आयोजित करावा असे सुद्धा त्यांनी नगराध्यक्ष सौ. रेणुका पाटील यांना सुचवले सदरच्या ठरावास संपूर्ण सभागृहाने मान्यता दिली. यामुळे आता लवकरच आमदार चंद्रकांत पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.



