सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | कोचूर येथील पंकज पाटील, कमलाकर पाटील आणि मित्र परिवाराने आदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा करून आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे.
दिपावली सण मोठ्या उत्सवात घराघरात साजरा करण्यात येतो. मात्र आपल्या आर्थिक कोंडीमुळे दिवाळी साजरी न करणार्या आदिवासी बांधवासोबत देखील आपल्या घराप्रमाणेच दिपावली उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी पंकज पाटील कमलाकर पाटील आणि मित्र मंडळीनी एकत्र येत यंदाची दिवाळी कोचुर येथील आदिवासी बांधवासोबत साजरी करून समाजाप्रती आपले एक कर्तव्य पार पाडले.
यावेळी सावदा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील ,ज्येष्ठ पत्रकार शामकांत पाटील, लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी जितेंद्र कुलकर्णी, अनोममदर्शी तायडे, सिद्धांत तायडे,आनंद वाघोदे, पवन पाटील यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.
पंकज पाटील, कमलाकर पाटील आणि मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.