सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा ग्रामिण रूग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि अभिपरिचारीका यांच्याशी हुज्जत घालनू शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा पोलीस ठाण्यात मेडीकल मेमो घेवून येणारा रवी जानराव पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर ह.मु. सावदा हा सावदा ग्रामीण रूग्णालयात आला होता. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निकीता भिरूड आणि अभिपरिचारीका शकुंतला राजनाथ पाल हे रूग्णालयात उपस्थित होते. त्यावेळी रवी पाटील यांच्यासह आकाश योगेश भंगाळे रा. चिनावल, आणि चंद्रकांत गोपाळ पाटील रा. कोचर ता. रावेर यांनी दुखापतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच ग्रामीण रूग्णालयात उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनोद दामोदर यांच्याशी देखील हुज्जत घालून शिवीगाळ केली. यासंदर्भात अभिपरिचारीका यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवी जानराव पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर ह.मु. सावदा, आकाश योगेश भंगाळे रा. चिनावल, आणि चंद्रकांत गोपाळ पाटील रा. कोचर ता. रावेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.