रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंकलेश्वर ते बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजीत चौपदरीकरणातून सावदा आणि रावेर शहराला वगळण्यात आल्याने या परिसरात उद्रेक निर्माण झाला असून याच प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अंकलेश्वर ते बर्हाणपुर महामार्ग चौपदरीकरणाचे नोटाफिकेशन आज जारी करण्यात आले आहे. यात जेथून हायवे जाणार आहे त्या गावांची नावे देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रावेर व सावदा या शहरांना वगळलेले दिसून येते. याच्या विरोधात आता श्रीराम पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन दिले आहे. यात नमूद केले आहे. रावेर शहर हे रावेर लोकसभा मतदार संघ व तसेच रावेर विधानसभा मतदार संघ या नावाने ओळखले जाते. असे असतांना देखील जमीन भूसंपादनासाठी रावेर व सावदा या शहरांना वगळून ग्रामीण क्षेत्रामार्गे चौपदरीकरण महामार्ग मुक्ताईनगर तालुक्याला जोडला जात आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी पासून अंकलेश्वर-बर्हाणपुर राज्यमार्ग क्रमांक-४ वापरात आहे. आणि ते फैजपुर-सावदा-रावेर ते चोरवड महाराष्ट्र राज्याची सीमा असे बर्हाणपूर असे जात आहे. त्यावर परिवहन नाके आज पर्यन्त अमंलात आहे. रावेर-सावदा-फैजपुर परिसर व या शहरातील सर्व शेतकरी बांधव केळी उत्पादक व्यापारी म्हणून जगप्रसिद्ध आहे. असे असून सुद्धा या दोन्ही शहर वासीयांना दळणवळण व व्यवसायापासून वंचित व दूर करन्यात येत आहे असे अन्याय होऊ नये म्हणून ठिया आंदोलन करण्याचे निवेदन देत आहे. केळी माल निर्यात करण्यासाठी रावेर सावदा-फैजपुर येथे ट्रक लोडींग ट्रान्सपोर्टिंग केळी निर्यात करण्याचे कार्य सदैव राहणार आहेत.
असे असताना सुद्धा रावेर लोकसभा विधानसभा मतदार संघावर चौपदरीकरण रस्त्याचे भूसंपादन वेगळ्या दिशेने होत असून आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या सहनशिलतेच्या अंत आहे. चौपदीरकरण रस्ता हा रावेर व सावदाफैजपुर या शहरातून किंवा शहराला लागून झाला पाहिजे. अशी आमची मागणी निवेदना द्वारे नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री, भारत सरकार द्वारा, तहसीलदार रावेर यांच्या मार्फत केली आहे. व ती मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर श्रीराम फाऊंडेशन अध्यक्ष श्रीराम दयाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष अ.मुत्तलीफ अ.रफिक, संचालक रावेर पीपल्स बँक सोपान साहेबराव पाटील, शे.मेहमूद शे.हसन, माजी जि.प सदस्य आत्माराम कोळी, माजी सरपंच अतुल पाटील, सीताराम पाटील, स्वप्नील पाटील, राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, गोविंद पाटील, घनश्याम पाटील, प्रवीण पाटील, रामचंद्र पाटील, सुरज कोलते, डी.डी.वाणी, रवींद्र महाले, श्रीकांत बोरसे, मनोज लोहार, विलास महाजन आदी उपस्थित होते.