फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । समाजातील वंचित व शोषितांसाठी कार्य करण्याचे आवाहन सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले. ते लोकमित्र सन्मान सोहळ्यात बोलत होते.
लोकमित्र सन्मान सोहळा
फैजपूर येथील म्यूनिसिपल हायस्कूलच्या पटांगणवर रविवारी राष्ट्रसंत श्रीगाडगेबाबा लोकमित्र सन्मान सोहळा पार पडला. त्यानिमित्त आयोजित समाजप्रबोधनपर किर्तन कार्यक्रमाच्या विचारपीठावरून उपस्थितांना त्यांनी प्रबोधन केले. या विचारपीठावर जनसंग्राम बहुजन लोकमंचचे संस्थापक विवेक ठाकरे,महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे आरोग्य समिती प्रदेशाध्यक्ष गोपी अण्णा चाकर,बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त किशोर पाटील कुंझरकर,सावदयाचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनी प्रकाश वानखेडे, फैजपुरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिम मन्यार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दोन तासांमध्ये केले प्रबोधन
आपल्या २ तासाच्या समाजप्रबोधन किर्तनातुन सत्यपाल महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करतांना पाखंडी बाबा,भगत-भोपे यांच्यावर सडाडून टिका केली. गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज यांनी जगाला वास्तवाशी जोडले असे नमूद करून त्यांनी देवळातील देवाला नाही तर माणसाना देव मानून पुंजले.दिन-दलित,वंचितांचे कैवारी होवून सेवा केली व अशा वास्तव विचारला फुंकर घालणार्या व आत्मभान जागवणार्या नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली.माझ्यावर पण जीवघेणा हल्ला करण्यात आला पण जातीय निर्मूलनाच्या उच्चाटनासाठी व वंचितांच्या न्यायासाठी आमच काम सुरूच राहिले असे धगधगते विचार मांडत उपस्थितांना तब्ब्यल दोन तास खिळवून ठेवले.
यांचा झाला सन्मान
दरम्यान, जाहीर किर्तनापुर्वी राष्ट्रसंत सत्यपाल महाराज यांच्या हस्ते शिक्षण,सामाजिक,राजकीय, उद्योग,शेती, सांस्कृतिक,महिला सक्षमीकरण,कला,क्रीडा व इतर क्षेत्रात विशेष काम करणार्यांना राष्ट्रसंत श्रीगाडगेबाबा लोकमित्र सन्मानाने गौरवण्यात आले. यात जनसंग्राम बहुजन लोकमंचाच्या वतीने आदिवासी सेवा मंडळ (आसेमं),फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशिय संस्था, कै.शंकररावजी काळुंखे चॅरीटेबल ट्रस्ट,सामाजिक समतामंच,अट्रावल ता.यावल येथील डॉ.बी.आर. आंबेडकर फाऊंडेशन,निंभोरा येथील युवा रसिक मंडळ,मस्कावद येथील मनूमाता महिला कृषी विज्ञान मंडळ,मौलाना आझाद अल्पसंख्यांक संस्था,सर्वश्री चिंतामणी फौंडेशन,रावेर येथील सांस्कृतिक कलामंचचे हेमेंद्र नगरीया,साई मोरया ग्रुप, युवाशक्ती फौंडेशन,भरारी बहुउद्देशीय संस्था या संस्थासंह क्रीडा क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ क्रीडापटू फारुख शेख,बहुजन चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंद सपकाळे,प्रा.राजेश जाधव,प्रवीण पाटील,श्वेता पाटील,मनोज भालेराव,उद्योजक अशोक चौधरी (कळमसरा), अविनाश पाटील, सुनिल दाभाडे, ऐनपूर येथील जगन्नाथ शामू पाटील,विवरा येथील दत्ता पाटील, प्रयोगशील शेतकरी रवींद्र भोगे (निंभोरा), प्रशांत वसंतराव महाजन (तांदलवाडी),तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष योगेश पाटील,के-हाळा येथील महिला पोलीस पाटील सौ.वर्षा पाटील, जयश्री कुलकर्णी (रावेर),प्रशांत महाशब्दे,श्रीमती सुवर्णलता उत्तम अडकमोल (भुसावळ), साहित्यिक डी.डी.पाटील (जामनेर),डॉ.पांडुरंग आल्हाट, आरोग्यदूत अरविंद देशमुख, जयसिंग वाघ (जळगाव),कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे,पंकज महाजन,वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष दिपक पवार,प्रा.विमल वाणी यांच्यासह विविध क्षेत्रात लौकीकपात्र काम केलेल्या ६० जणांना राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा लोकमित्र हा राज्यस्तरीय सन्मान बहाल करण्यात आला.
यांचे सहकार्य
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य समन्वयक वाय.डी.पाटील यांनी तर ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यध्यक्षा सौ.मनिषा ठाकरे यांच्यासह सुधाकर पुना भंगाळे,संजय कांडेलकर, विश्वनाथ मोरे,सुमित बोदडे, अमोल चौधरी,स्वप्नील पवार, सचिव दिपक मांडोळे,नरेंद्र जाधव,मोहम्मद पिंजारी, हितेश रायपूर,धोबी युवा मंचचे विजय बाविस्कर,धोबी समाजाचे फैजपूर शहराध्यक्ष मुकेश सोनवणे,अनिल पाटील,सुनील सुतार,धनश्री ठाकरे,भगवान कोकाटे, भाग्यश्री ठाकरे, निशिकांत बामणोदकर, गौरव ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.