Home Cities धरणगाव धरणगावात प्रा. सुषमा अंधारे यांचे दणदणीत व्याख्यान

धरणगावात प्रा. सुषमा अंधारे यांचे दणदणीत व्याख्यान


sushama andhare

धरणगाव (प्रतिनिधी) येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय समितीतर्फे उद्या (शनिवार) दिनांक १ जून २०१९ शनिवार रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सार्‍या महाराष्ट्रात गाजलेल्या फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध व्याख्यात्या प्रा. सुषमा अंधारे यांचे कोटबाजार सानेगुरुजी पटांगणावर दणदणीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

धरणगावातील सर्व नागरिकांनी विशेषतः महिलांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, (बैठकीसाठी सर्वाना खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे )असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सलीम भाई पटेल, कार्याध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपाध्यक्ष शिरिष बयस. सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे, मार्गदर्शक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डी. जी. पाटील साहेब ,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष भानुदास विसावे आणि निमंत्रक माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे आदिंनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound