मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातोड शिवारात खून करून फेकून दिलेल्या व्यक्तीच्या दोन मारेकर्यांना पोलिसांनी अवघ्या ७२ तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर शहराला लागून असलेल्या मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस सातोड शिवारात दिनांक ६/०६/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वाजता अनोळखी पुरुष ाचा मृतदेह आढळून आला होता. सातोड शिवारातील सिताराम लहानु बिचकुले यांचे शेत गट नंबर १२७ चे समोर मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे सिमेंट रोडच्या डाव्या बाजूचे नाल्यात एक अनोळखी इसमाचे प्रेत त्याचे डोके रक्ताने माखलेल्या स्थितीत पडलेला मिळुन आला. त्यावरुन सदर अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने जिवे ठार केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन स्थानिक पोलीस स्टेशन व स्थागुशा जळगांव येथील स्वतंत्र पथक तयार करुन प्रथम अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे दृष्ट्रीने प्रयत्न सुरु केले. अनोळखी इसमाबाबत माहिती घेत असतांना. सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि जालींदर पळे यांनी पोलीस स्टेशनला मिसींग नंबर २४/२०२३ अन्वये दाखल असल्याची माहिती दिली.
दरम्यान, या फिर्यादीतील बेपत्ता असणार्या व्यक्तीचे नाव रविंद्र मधुकर पाटील, वय-४६,रा.चिनावल असे असून त्याचे उजव्या हातावर रोशनी नाव गोंदले असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलिसांनी मिसींग व्यक्तीचे नातेवाईकांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे पाचारण केले. तेव्हा मयताची पत्नी सौ.नम्रता रविंद्र पाटील व भाऊ योगेश मधुकर पाटील हे समक्ष पोलीस स्टेशनला हजर होवून मयताचे प्रेत पाहून मयत हा रविंद्र पाटील असल्याचे खात्री करुन सांगितले. त्यावरुन योगेश मधुकर पाटील यांचे फिर्यादवरुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशन भाग-५ ००११५ ए०.२००/२०२३ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे दाखल करुन अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे स्वतंत्र पथक रवाना केले.
हे पथक चौकशी करत असतांना गुन्ह्यातील अज्ञात मयत यास दिनांक ४/०६/२०२३ रोजी मुक्ताईनगर शहरातील संशयीत राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांचे सोबत एकत्र पाहिल्याची माहिती मिळाली. त्यावरुन राहुल काकडे व योगेश काकडे यांची माहिती घेतली असता ते गावात मिळून आले नाही. दिनांक ९ रोजी पोलीस स्टेशनचे पथकातील अधिकारी व कर्मचारी संशयीत राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांचा शोध घेत असतांना ते मिळून आल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले.
या दोघांची चौकशी केली असता, रविंद्र पाटील यांच्याकडे १५०००/- रुपये रोख असल्याचे समजल्याने त्यांनी त्यास मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे रोडने एक किमी अंतरावर नेवून त्याचे जबळील पैसे, मोबाईल व इतर वस्तु काढून त्यास दगडाने जबर मारहाण करुन जिवे ठार केले अशी माहिती त्यांनी दिली. या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल संतोष काकडे,वय-२५,रा.रेणुकानगर रेणुकामाता मंदीराचे पाठीमागे मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर, आणि योगेश गजानन काकडे,वय-१९,रा.जुनेगांव जुनी उर्दु शाळे जवळ मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर यांना अटक केली असुन गुन्ह्याचा तपास चालू आहे.
या खुनाच्या गुन्ह्याचे तपासात एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक,जळगांव, रमेश चोपडे,
अपर पोलीस अधीक्षक ,जळगाव, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर उपविभाग मुक्ताईनगर, किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी मार्गदर्शन केले.
तर, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे एपीआय तथा प्रभारी अधिकारी संदीप दुनगहू यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक, संदीप चेढे, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ शेलेश चव्हाण, पोना संतोष नागरे, पोना कांतिलाल केदारे, पोना नितीन चौधरी, पोना देवसिंग तायडे, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोना विजय पढार, पोना संजय पवार, पोना संदीप खंडारे, पोना विनोंद सोनवणे, पोना सुरेश पाटील, पोकॉ रविंद्र मेढे, पोकॉ रविंद्र धनगर, पोकां मुकेश महाजन, पोकॉ अमोल जाधव, पोकॉ अंकुश बाविस्कर, पोकॉ विजय कचरे, पोकॉ सचिन जाधव, पोकॉं प्रशांत चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ दिपक पाटील, पोना किरण धनगर, पोना ईश्वर पाटील यांनी या कार्यवाहीत भाग घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या.
दरम्यान, पैशाच्या मोहातून चिनावल येथील रवींद्र मधुकर पाटील यांना आपले प्राण गमवावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.