मतपत्रीकेवर निवडणूक लढवून दाखवा-डॉ. सतिश पाटलांचे गिरीशभाऊंना आव्हान ( व्हिडीओ )

satish patil

जळगाव प्रतिनिधी । आपणास एवढा गर्व असेल तर बॅलेट पेपरने निवडणूक जिंकून दाखवा…या माध्यमातून पुन्हा एकदा निवडून आलो नाही तर नाव सांगणार नसल्याचे सांगत आज आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांना थेट आव्हान दिले.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी आमदार सतिश पाटील यांनी जिल्ह्यातील समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी तुमच्यासाठी सभा शेवटची आहे असे सांगितल्यावर आमदार डॉ. पाटील यांनी आक्रमक पवित्रा धारण करत बॅलेट पेपरने निवडणूक जिंकून दाखवा असे आव्हान दिले. ते पुढे म्हणाले की, पाच वर्षातील ही पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांची पहिली आणि शेवटी डीपीडीसी मिटींग आहे. दीड महिन्यानंतर आचार संहिता लागू होत आहे. नियोजन बैठकीत अनेक समस्यांचे निराकरण होते. मात्र आलेला पैसा नियोजनाअभावी खर्च करता आला नसल्याने सर्व पैसे पुन्हा शासनाकडे जमा झाले आहे. यापुर्वी स्व. पांडुरंग फुंडकर व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाची कामे न करता एखाद्या लग्नाला किंवा पर्यटनाला आल्यासारखे येवून अर्ध्या तासात डीपीडीसीच्या बैठकी आवरल्या होत्या. त्यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठोस निर्णय घेतला नाही. या नियोजनामुळे दोन वर्षांपासून जळगाव जिल्हा दुष्काळाने होरपळतोय. कोणतेही कामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले नाही. नियोजनाचा निर्णय अधिकार्‍यांनीच बैठक घेतल्याने जिल्ह्यातील अनेक कामे रखडले असल्याचा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी केला.

आमदार डॉ. सतीश पाटील पुढे म्हणाले की, सात बलून बंधारे बांधण्यासाठी मोठा गाजावाजा केला होता. याचा प्रश्‍न या बैठकीत केला होता. या कामांची सद्यस्थिती काय आहे ? सत्ताधार्‍यांना याची विचारले असता त्यांनी पाच वर्षे खोटे बोलण्यात घालविले. आज शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. संकटमोचक ना. गिरीश महाजन यांनी आज हातात असलेल्या आमदारांना सोबत घेवून जिल्ह्याचा काय विकास करायचा आहे तो करावा. दरम्यान, नियोजन मंडळाची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना डॉ. सतीश पाटील यांनी आपल्या आव्हानाचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले की, मतपत्रीकेद्वारे मतदान झाल्यास मी निवडून आले नाही तर नाव सांगणार नाही.

पहा : आमदार डॉ. सतीश पाटील यांनी ना. गिरीश महाजन यांना दिलेल्या आव्हानाचा व्हिडीओ.

Protected Content