साठवण बंधा-यांचे संतांच्या हस्ते जलपुजन (व्हिडीओ)

jalpujan

 

फैजपूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी यावल रावेर तालुक्यात पावसाने कमी हजेरी लावल्यामुळे याभागात दुष्काळ जाहीर करावा लागला. यावर्षी अशी परिस्थिती येवून नये यासाठी आज दि. 12 ऑगस्ट रोजी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामीनारायण गुरुकुलचे भक्तीस्वरूप दाजी व आ. हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून नावरे, रोझोदा, सातोद याठिकाणी विधिवत जलपूजन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोघं तालुक्यांमध्ये केळी हे मुख्य पीक असल्याने या भागातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून या भागातील संत महंत यांच्या आशीर्वादाने ‘थेंब अमृताच्या’ लोक सहभागातून जलसंधारणाची कामे मार्च ते जून महिन्यांत सुरू झाली. कामांचे या कामांचे फरीद साध्य होऊन ज्या भागात खोलीकरण व चर मारणे बंधारे दुरुस्त करणे अशी कामे या लोकसहभागातून करण्यात आली. या कामाचे फलित झाल्याने दोन दिवसांच्या पावसाने पूर्ण नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने संताच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

नागरिकांनी स्व:परीने केली मदत

मार्च महिन्यात संतांनी दिलेल्या संकल्पनेनुसार, या थेंब अमृताच्या जलसंधारण कामाला सुरुवात झाली होती. या अभियानात सर्व नागरिकांनी आपल्या परीने जी मदत या अभियानाला देता येईल ती देण्याचा प्रयत्न या भागातील नागरिकांनी केला. साकळी जवळील नावरे बंधारा हा 2006पासून वाहून गेलेला होते. या भागातील नागरिकांसाठी हा बंधारा तयार करणे, हे एक मोठे आव्हानच होते. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. या प्रयत्नांना थेंब अमृताच्या लोकसहभाग चळवळीतून यशस्वी झाले. नद्यांमध्ये उभे आडवे बोअर मारणे ही कामे उन्हातील दोन महिन्यात नागरिकांनी स्वतः केली. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, भक्तीप्रकाश दाजी शास्त्री, भक्ती स्वरूपदासजी, प.पू. मानेकर बाबा, प.पू. स्वरूपानंद महाराज या सर्व संतांच्या आशीर्वादाने यशस्वी झाले. यात आ. हरिभाऊ जावळे यांनी देखील चांगल्या प्रकारे थेंब अमृताच्या या लोकसहभाग चळवळीला मदत केली.

यांची होती उपस्थिती

यामध्ये रोझोदा येथील सुखी नदीमध्ये येण्यासाठी 24 तास पाणी यायला लागले याचे कारण म्हणजे थेंब अमृताच्या लोकसभा चळवळीतून झालेल्या जलसंधारणाची होली कणांमध्ये आतापर्यंत 40 कोटी लिटर पाणी जमीनीत गेले. यामुळे रोझोदा परिसरातील नागरिक समाधानी आहे. नावरे बंधाऱ्याचे जलपूजन करतांना महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, प.पु. मनेकर बाबा भक्तीस्वरुपदासजी, आ. हरिभाऊ जावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, जेडीसीसी बँक संचालक गणेश नेहेते, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नारायण चौधरी, यावल पंचायत समिती गटनेते दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विलास पाटील, साकळी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर, दीपक पाटील, दिनकर माळी तसेच परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content