Home राजकीय सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

0
58

327856 udayanraje bhosale
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही 21 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली, पण त्यावेळी उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मात्र घोषणा केली नव्हती. त्यामुळे उदयनराजें तणावात आल्याचे बोलले जात होते. कारण विधानसभेसोबत साताऱ्यातील पोटनिवडणूक घेण्यात यावी, या अटीवर उदयनराजेंनी प्रवेश केला होता. मात्र आता सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबतच होणार आहे. त्यामुळे ही बातमी उदयनराजेंसाठी दिलासादायक आहे.


Protected Content

Play sound