जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखेड येथील विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. मात्र सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पूरी गोलवाडा येथील माहेर असलेल्या रोहीणी महेंद्र कोळी (23) रा.पिलखेड ता.जळगाव यांनी आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसतांना दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी सासरची मंडळी घरी नव्हती. दरम्यान जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. सासरच्या मंडळीतील पती, सासरे, दिर यांनी शेती घेण्यासाठी रोहिणीला माहेरहून तीन लाख रूपये आणावे असा तगादा लावला होता. मात्र वडीलांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे पैसे देवू शकले नाही अशी माहिती मयत रोहीणीचे वडील अशोक बळीराम तायडे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले. तर सोमवारी दुपारी मोठी बहिण शिला सचिन सोनवणे यांना देखील फोन करून जीवनाला कंवटाळले असे सांगितले होते. सासरच्या मंडळीना समजूत काढण्यासाठी उद्या सकाळी येणार होते तोच बहिणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा निरोप आला. मयत महिलेला एक वर्षांची मुलगी देखील आहे. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1005513569785294/