सरस्वती फोर्ड शो रूम फोडण्याचा प्रयत्न; एक महिन्यानंतर पोलीसात गुन्हा

sambhaji nagar chori

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या तरसोद येथील सरस्वती फोर्ड अज्ञात चार चोरट्यांनी सरस्वती फोर्डचे शोरूम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नशिराबाद पोलीसात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, 25 नोव्हेंबर रोजी रात्री 1.05 वाजेच्या दरम्यान 20 ते 25 वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधून चोरी करण्याच्या उद्देशाने तरसोद रोडवरील सरस्वती फोर्ड शोरूम लोखंडी टॉमीचा वापर करून फोडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी शटरचा पत्रा उचकावून टाकला होता. हा प्रकार शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याचे सर्व फुटेज नशिराबाद पोलीसांना देण्यात आले होते.

शोरूम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर एक महिन्यापुर्वी सीसीटीव्ही फुटेज पोलीसांना देवून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेच्या एक महिन्यानंतर 25 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठवड्यापुर्वीच शोरूम फोडणाऱ्या टोळी अटक करून तब्बल 8 गुन्ह्याची उकल केली होती. या टोळीला पकडल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला असवा असे तर्कवितर्क काढण्यात येत नाही. सरस्वती फोर्डचे बॉडीशॉप मॅनेजर दिलीप एकनाथ बेंडाळे (वय-52) रा. अयोध्या नगर, रामचंद्र नगर यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात भाग 5 गुरनं. 110/2019 भादवी कलम 457, 380, 34, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस करीत आहे.

Protected Content