बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या संस्थांना भेट देऊन श्रींच्या समाधी दर्शन घेतले.
अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देशातील प्रमुख देवस्थानांना भेट देवून तेथील विश्वस्तांशी संवाद साधत आहे. या अनुषंगाने मोहन भागवत यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाला भेट दिली. सरसंचालक मोहन भागवत यांच्या आगमना निमित्ताने शहरात तसेच श्री संस्थान परिसरात चौख बंदोबस्त होता. त्यांच्या आगमन पार्श्वभूमीवर सनई चौघडा टाळ मृदंगाच्या निनादात ब्रह्मवृंदांच्या हस्ते संस्थांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंत्र उपचारात औक्षण करण्यात आले. श्री संस्थांकडून सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी श्री संस्थानकडून राबविण्यात येत असलेल्या लोकउपयोगी उपक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली. या उपक्रमाचे मोहन भागवत यांनी कौतुक केले.