परसाडे येथील सरपंच मिना तडवी अपात्र : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील परसाडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांनी शासकिय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर त्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र केले असुन, या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की , परसाडे तालुका यावल लोकनियुक्त सरपंचपदावर येथील ग्राम पंचायतच्या झालेल्या 2022च्या निवडणुकीत मिना राजु तडवी या अटीतटीच्या निवडणुकीत अल्पमतांनी निवडून आल्या होत्या. येथील शब्बीर कान्हा तडवी यांनी मिना तडवी यांच्या विरोधात अतिक्रमणाच्या मुद्यावरून दाद मागतली होती. यात सरपंच मिना राजु तडवी यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध विविध प्रशासकीय यंत्रणेतुन चौकशी करीत सरपंच यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकनियुक्त सरपंच परसाडे मिना राजु तडवी यांना अतिक्रमण प्रकरणी अपात्र करीत असल्याचे आदेश पारित केले आहेस.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाबाबत बोलतांना तक्रारकर्ते शब्बीर तडवी यांनी म्हटले आहे की, सदरचे अतिक्रमण प्रकरण हे कोणतेही राजकारण व राजकीय वाद किंवा हेवेदाव्यांची नसुन प्रशासकीय नियमाची लढाई असुन यात आमही वरिष्ठांकडे केलेली वस्तुनिष्ठ तक्रार ही सत्य असल्याने निर्णय आमच्या बाजुला लागल्याची प्रतिक्रीया देत विजय हा सत्याचा झाला असल्याचे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण प्रकरणातील तक्रारकर्ते शब्बीर कान्हा तडवी यांनी दिली आहे .

Protected Content