यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच कविता सोळंके (वय – ३२) यांचे आज दुपारच्या सुमारास निधन झाले.
डांभुर्णी येथील विद्यमान सरपंच सौ. कविता समाधान सोळंके यांचे ९ जून रोजी दुपारी १ वाजता निधन झाले. सप्टेंबर २०२०मध्ये त्यांची डांभुर्णी ग्राम पंचायतच्या सरपंचपदी निवड झाली होती त्यांच्या सरपंचपदाच्या अल्पशा कालावधीत सौ . कविता सोळंके यांनी अत्यंत प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या विदगावच्या माहेरवासी होत्या त्यांच्या निधनामुळे विदगाव आणी डांभुर्णी या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पती समाधान कोळी, मुलगा, सासु – सासरे, जेठ असा परिवार आहे. सरपंच सौ. कविता सोळंके यांच्या अशा दुदैवी निधना बद्दल सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा डांभुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच पुरूजीत चौधरी यांनी आपल्या शोकसवेदना व्यक्त केल्या असुन आपण शब्द पाळणारे एकनिष्ठ व विश्वासु सहकार्यास मुकलो असल्याची त्यांनी म्हटले. सरपंच सौ. कविता सोळंके यांच्यावर डांभुर्णी येथे ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आलेत.