सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी।महाराष्ट्रातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पुढील प्रमाणे विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषद यांचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले.

या बाबत अधिक माहिती अशी की, १८ डिसेंबर ते २० डिसेंबर या तीन दिवसीय कालावधीत ग्रामपंचायत कामबंद आंदोलन असल्याने यशस्वीपणे सुरू आहे. या आंदोलनाच्या
माध्यमातून ग्रामपंचायत कामकाज कडकडीत बंद आहे. शासनाने प्रलंबित आणि विविध मागण्या त्वरित मान्य कराव्या. मागण्या मान्य न झाल्यास किंवा शासनाने दुर्लक्ष केल्यास जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा लाखोच्या संख्येने भव्य असा “अपेक्षा मोर्चा “मुंबई मंत्रालयावर काढण्यात येईल. अश्या इशारा देण्यात आला आहे.

Protected Content