यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयात रिक्त असलेल्या निवासी नायब तहसीलदारपदी संतोष निवृत्ते रुजू झाले आहेत.
यावलच्या तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तत्कालीन निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार हे आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून मागील महिन्यात सेवानिवृत्त झाले. पवार यांच्या रिक्त झालेल्या पदावर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आस्थापना विभागात कार्यरत असलेले संतोष निवृत्ते हे रुजू झाले आहेत. त्यांनी निवासी नायब तहसीलदार पदाची सुत्रे सांभाळली आहे.
यावल तहसीलच्या निवासी नायब तहसीलदारपदाची सुत्रे स्वीकारल्यावर तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, संजय गांधी निराधार समितीच्या नायब तहसीदार भारती भुसावरे, पुरवठा निरिक्षक अंकीता वाघमुळे, दिपक बाविस्कर, लियाकत तडवी, रविन्द्र मिस्त्री यांच्यासह सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने संतोष निवृत्ते यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.