नाशिक, विशेष प्रतिनिधी | संगमनेर येथील कुबेर समूह व प्रकाशनाचे अध्यक्ष संतोष जगन्नाथ लहामगे यांची यंदाच्या ‘राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
नाशिक येथील अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण पत्रकार दिनी येत्या ६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दुपारी ३.०० वाजता शालीमार हॉटेलजवळील रोटरी क्लब सभागृहात संपन्न होणार आहे.