भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवर माजी आमदार संतोष चौधरी यांनी ”भुसावळातील खड्डे मोजा आणि एक लाख ११ हजार रूपये मिळवा” अशी अनोखी ऑफर जाहीर करून धमाल उडवून दिली आहे.
येथील तेली मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यानंतर पत्रकार परिषदेत संतोष चौधरी यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भुसावळात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून शहरातील खड्डे मोजून दाखविणार्यास एक लाख ११ हजार रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. शहरासह तालुक्यातील रस्त्यांची अवस्थे बिकट असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा अरोप त्यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी सतीश घुले अथवा त्यांच्या पत्नी सुनीता घुले यांना दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. तर याप्रसंगी उमेश नेमाडे यांनी आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, हल्ली आमदारांना स्वत: खड्डे बुजवावे लागत आहेत.