जळगाव (प्रतिनिधी) आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 669 वा संजीवन समाधी सोहळा नामविश्व शिंपी समाज फौंडेशनतर्फे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज संतशिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी समाजसेवक शिवाजीराव शिंपी , किशोर शिंपी, डॉ डी.आर. शिंपी, तलाठी आर.बी.खैरनार, माजी समाजध्यक्ष रमेश कापूरे , युदीश खैरनार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय बालकीर्तनकार माईसाहेब यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संपूर्ण जीवनक्रम त्यांच्या प्रवचनातून उलगडून दाखवला. शांती, समता, एकता, आणि भक्तीचा मार्ग दाखवत वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण भारतभर पसरवणारे आणि एक नव्हे तर, दोन राज्यात समाधी असलेले एकमेव संत आहेत, असा उल्लेख त्यांनी आपल्या प्रवचनात केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवाजीराव शिंपी यांनी भूषवले. तर संस्थाध्यक्ष बाळकृष्ण देवरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रुपेश जगताप, मोहन शिंपी यांनी तर आभार प्रदर्शन सचिव भूषण निकूभ यांनी केले. तसेच यावेळी भिकन जगताप, अशोक जगताप, दत्तात्रय खैरनार, राजेंद्र शिरसाठे, जितेंद्र मांडगे, यांनी मार्गदर्शन केले.
सकाळी 10 वाजता आशा बाबा परिसरातील गजानन महाराज मंदिरापासून धार्मिक वातावरणात पारंपरिक पध्दतीने रिंगण आणि फुगड्या खेळत, भजन कीर्तनाच्या रंगात टाळ मृदुंगाच्या गजरात नामदेवाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत आणि सोहळ्यात परिसरातील साधारण दीड समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. समाजात गरीब वर्ग तसेच सर्वसामान्य घटक देखील येतात. त्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडली किंवा कुणी प्रियजन स्वर्गवासी झाला. तर त्यांना अशा दुःखद प्रसंगी उपस्थित नातलग, परिवाराला पहिल्या दिवसाच्या भोजनाची व्यवस्था किंवा 1001 रुपये मदत म्हणून दिले जातील, असे जाहीर करण्यात आले.
प्रहित जनहित फौंडेशनच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. 200 समाज बांधवांनी याचा लाभ घेतला. भविष्यात समाज बांधवांसाठी अत्त्यल्प खर्चात वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका समाज सहभागातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असे संस्थाध्यक्ष बाळकृष्ण देवरे, मुकेश सोनवणे, संदीप जगताप, योगेश शिंपी, भूषण निकम, निलेश जगताप , हरीश सोनवणे, निलेश सोनवणे, यांनी जाहिर केले.
नामविश्व शिंपी समाज फौंडेशनतर्फे कार्यक्रमासाठी निनाद शिंपी, निंबा सोनवणे, योगेश देवरे, राकेश जगताप, अर्पण शिंपी, सचिन शिंपी, गौरव शिंपी, तनय भांडारकर , चेतन सोनवणे, स्वप्नील शिंपी, हर्षल शिंपी, गणेश सोनवणे, सुधाकर कापूरे, हेमंत खैरनार, सुनील देवरे, नरेंद्र सोनवणे, ललित शिरसाठे, निनाद कापुरे, भोला मंडगे, उमेश शिंपी, राहुल शिंपी, प्रशांत जगताप, महिला मंडळाच्या सुरेखा जगताप, माधुरी देवरे, सारिका जगताप, पूजा निकम, कल्पना जगताप, नीता देवरे, माधुरी शिंपी, आरती सोनवणे, चेतना जगताप, कविता सोनवणे,मनीषा शिंपी, संगीता जाधव, यांनी परिश्रम घेतले.