अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराज यांचा द्वीशताब्दी महोत्सव साजरा झाल्यानंतर अमळनेरला पालखी सोहळा देखील उत्साहपूर्ण वातावरणात सकाळी सात वाजता वाडी संस्थानातून निघाला. यात तालुक्यातील हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
या पालखी सोहळ्यात संत सखाराम महाराजांची भव्य मूर्ती प्रतिमा दिसत होती. या पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. परमपूज्य संत सखाराम महाराज संस्थानचे वारस अधिकारी विद्यमान सत्पुरुष प्रसाद महाराज यांचे अनेक महिला व पुरुषांनी दर्शन घेतांना महाराजांनी सर्वाना आशीर्वाद दिला. वाडी संस्थान पासून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक व पालखी उत्सव कीर्तनाचे स्वरात निघला होता. त्यात पालखीच्या पुढे दिंडी भजनी मंडळ यांची पथके होती. पालखीच्या मागे मेणा होता.
सखाराम महाराज यांच्या पादुका देखील असतात. त्यांना देखील स्पर्श करीत भाविक तृप्त होतात. संत सखाराम महाराज यात्रा उत्सव वैशाख शुद्ध एकादशीचा उत्सव वैशाख शुद्ध 15 चा पालखी उत्सव या काळात पंढरीच्या पांडुरंगाचे अस्तित्व पंढरपूर येथे असते, असे भाविक समजतात. म्हणून या वेळी अनेक दिंड्या अमळनेरची वाट धरतात. ग्रामीण भागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपण पंढरपुरला आहोत, अशा प्रकारचे स्वप्न बघून विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. वारकरी संप्रदायाचा पालखी उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यात तुकोबा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रति पंढरपूरच्या दिशेने होणारा प्रवास भाविक नजरेत साठवून तृप्त होतो. या पालखी सोहळ्याचा दिंडी असते ती दहा ते अनेक वारकरी यात असतात. एक वीणावादक असतो. त्याचे नियंत्रण दिंडीचे कामकाज चालते. दिंडीच्या मागे पालखी व त्या संताच्या पादुका मुखवटे असतात.
संत सखाराम महाराज पालखी सोहळ्यात अमळनेर तालुक्याचे डीवायएसपी राजेंद्र ससाने ,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व त्यांचे कर्मचारी व पोलिस पाटील संघटनेचे उल्हास लांडगे रवींद्र पाटील ,संजय पाटील ,विजय पाटील, छोटू भिल ,भगवान पाटील, भानुदास पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.