भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लँका बोट्झ या संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आयआयटी मुंबई आयोजित ‘टेकफेस्ट’मधील रोबोवार स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत दहा देशांची सहभाग नोंदवला होता.
येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लँका बोट्झ या संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञान दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी आय आय टी मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान मेळावा टेकफेस्ट मधील रोबो वार स्पर्ध्येमध्ये उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम फेरित अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ब्लँकाच्या रोबोला ब्राझीलच्या रोबोने मात दिली. त्यामुळे मागील काही वर्षांच्या स्पर्धांमध्ये सलग विजय मिळवणार्या गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लँका बोट्झ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आय आय टी टेकफेस्ट बरोबरीनेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान असलेली स्पर्धा म्हणजे गुजरात राज्यातील पारुल युनिव्हर्सिटी आयोजित तंत्रविज्ञान मेळावा . ह्या मेळाव्या दरम्यान आयोजित रोबोटिक्स स्पर्धा सुद्धा गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लँका बोट्झ संघाने गाजवल्या. ह्या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत रोबो रेस आणि रोबो वार ह्या दोन स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
दरम्यान, संत गाडगेबाबा अभियंत्रीकीच्या संघात रोहित चौधरी, प्रणय शेवाळे, अराफात अहमद, शाह्बाज गवळी, शुभम झांबरे अमित तिवारी, मोहित बारस्कर, नायर गौतमकृष्ण अरुण, गौरव महाजन, राहुल न्हावकर, भुशण गोर्दे, अभय नरेंद्र महिरे, धिरज बेहरानी, सौरभ नितिन चौधरी आणि निशांत किशोर भंगाळे यांचा समावेश होता.
यश प्राप्त केलेल्या या चमूचे हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड, विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील, प्रा. नितिन खंडारे यांनी कौतुक केले आहे.