यावल प्रतिनिधी । उद्या शहरात कॉंग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व व खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संकल्य दिवस साजरा होणार आहे. दरम्यान या संकल्प दिवसाच्या निमित्ता केन्द्र शासनाच्या शेतकरी धोरणाविरुद्ध आंदोलन देखील करण्यात येणार आहे.
या आंदोलनात तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शहर अध्यक्ष जील्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ब्लॉक अध्यक्ष फ्रंटल व सेलचे आजी माजी अध्यक्ष नगराध्यक्ष, नगरसेवक, युवक काँग्रेस व तालुक्यातील शेतकरी बांधव विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य उद्या दि १९जून रोजी शनिवार सकाळी १०.३० वा मा खासदार मा राहुल गांधी यांचा वाढदिवस हा संकल्प दिवस म्हणुन साजरा करणार आहे.
रावेर यावल विधानसभेचे रावेर यावल विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी जिल्हा अध्यक्ष संदीपभैय्या पाटील, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे प्रदेक्ष अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा आदेशानुसार केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भुमिकेचे विरूद्ध आंदोलन करायचे आहे . असे आवाहान कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , वढोदे सरपंच संदीप सोनवणे , हाजी गफ्फार शाह तसेच अनु जाती विभाग जळगाव जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे यांनी केले आहे.