संजीव खन्ना यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पदाचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला. त्याआधीच न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे पुढचे सरन्यायाधीश होतील हे निश्चित झाले होते. त्यानुसार आज संजीव खन्ना यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. १० नोव्हेंबर २०२४ हा त्यांच्या सरन्यायाधीशपदाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे धनंजय चंद्रचूड बरोबर दोन वर्षांसाठी सरन्यायाधीशपदी होते. पण संजीव खन्ना यांना मात्र फक्त ६ सरन्यायाधीशपदी फक्त सहा महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ आजपासून सुरू झाला असला, तरी त्यांना धनंजय चंद्रचूड यांच्याप्रमाणे दोन वर्षं मिळणार नसून फक्त सहा महिनेच त्यांना या पदावर राहता येणार आहे. १३ मे २०२५ हा संजीव खन्ना यांच्या सेवेचा शेवटचा दिवस असणार आहे. त्या दिवशी ते निवृत्त होणार असल्यामुळे सरन्यायाधीश म्हणूनदेखील त्यांना फक्त १३ मे पर्यंतच पदावर राहता येणार आहे. परिणामी त्यांना सहा महिनेच या पदावर राहता येणार आहे. याआधी न्यायमूर्ती उदय लळित यांना जवळपास अडीच महिन्यांसाठीच सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलं होतं.

१३ वर्षं दिल्ली उच्च न्यायालयात सेवा दिल्यानंतर १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करताना या काळात त्यांनी १७ जून ते २५ डिसेंबर २०२३ दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या विधिविषयक समितीचे चेअरमन म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सरन्यायाधीशपदासोबतच आता न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याकडे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे कार्यकारी प्रमुख व भोपाळमधील नॅशनल ज्युडिशियल अकॅडेमीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य या अतिरिक्त जबाब

Protected Content