संजीव भट्ट,मोदी-शहा जोडी, हरेन पंड्या खून आणि बरेच काही !

65134293 2831780716894436 6920757094995984384 n

 

जळगाव : विजय वाघमारे

एक अधिकारी जो कोर्टात शपथपत्रावर सांगतो की, २००० मधील गुजरात दग्यांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांना लक्ष बनविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अचानक बेशस्तीचे कारण देत त्या अधिकाऱ्याला गुजरात पोलीस सेवेतून बडतर्फ केले जाते. काही दिवसांनी त्यांच्यावर ड्रग्स, कस्टडी इन डेथ सारखे गंभीर आरोप लागतात. आज त्या आयपीएस अधिकाऱ्याला जन्मठेपची शिक्षा सुनावली गेलीय. परंतू हे प्रकरण फक्त एवढेच नाहीय. संपूर्ण हकीगत जाणून घेण्यासाठी आपल्याला गुजरात दंगे, हरेन पांड्या खून, सोहराबुद्दीन, तुलसीराम प्रजापती, कौसर बी बनावट चकमक, जज लोया संशयास्पद मृत्यू इथपर्यंतचा घटनाक्रम समजून घेणे गरजेचे आहे.

 

संजीव भट्ट एक प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जायचे. असो…तो आता भूतकाळ आहे. कहाणी सुरु होते, १९९० मध्ये, ज्यावेळी भारत बंदच्या दरम्यान, जामनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा उफाळून आली होती. त्यावेळी पोलिसांनी १०० लोकांना अटक केली होती. यातील प्रभुदास माधवजी यांचा रुगणालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला होता. प्रभुदास यांचे भाऊ अमरुत वैष्णवी यांनी गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी अधिकारी तथा जामनगरचे तत्कालीन एसएसपी संजीव भट्ट यांच्या विरुद्ध आपल्या भावाला पोलीस कोठडीत मारहाण केल्यामुळे आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.

 

प्रदीर्घ कालावधीनंतर संजीव भट्ट यांना शुक्रवारी (दी २० जून ) गुजरात हायकोर्टाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. परंतू एवढ्या पुरता संजीव भट्ट यांच्या प्रकरणाकडे बघितले तर चुकीचे ठरेल. कारण याच भट्ट यांनी सार्वजनिकरित्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर २००० मधील गुजरात दग्यांबाबत गंभीर आरोप केले होते. एवढेच नव्हे तर, गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्याप्रकरणात आपल्यावर पुरावे मिटविण्याचा दबाव टाकण्यात आला होता.  गुजरात दंगलीसाठी मोदी जबाबदार असून त्यांच्या विरोधात असलेले अनेक पुरावे अजून समोर यायची बाकी आहेत. मोदी मला हरेन पांड्या प्रमाणे मारू शकतात. परंतू मी या गोष्टीनी घाबरणारा नाहीय. मी सर्व परिस्थितीला सामोरे जायला तयार आहे. अशा अनेक गोष्टी ऑक्टोबर २०११ मध्ये जेलमधून बाहेर आल्यावर संजीव भट्ट यांनी पत्रकरांना अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

28 सप्टेबर 2011मध्ये संजीव भट्ट यांनी कोर्टात सांगितले होते की, गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्याप्रकरणात आपल्यावर पुरावे मिटविण्यासाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. भट्ट हे साबरमती जेलचे अधीक्षक असतांना तेथे हरेन पांड्या खून प्रकरणातील आरोपी असगर अलीने त्यांना पांड्या प्रकरणाची सर्व हकीगत सांगितली होती. त्यानुसार पांड्या यांना मारण्याची सुपारी तुलसीराम प्रजापती नामक व्यक्तीने दिली होती. तुलसीराम प्रजापती हा सोहराबुद्दीनचा सहकारी होता आणि सोहराबुद्दीन हा आयपीएस अधिकारी तथा मोदी-शहा यांचे कधीकाळी विश्वासू असलेले डी.डी.वंजारा यांच्यासाठी काम करायचा असा आरोप लागला होता.

संजीव भट्ट साबरमती जेलचे अधीक्षक असतांना त्यांना हरेन पांड्या यांच्या खून प्रकरणाशी संबंधित अनेक पुरावे मिळाले होते. विशेष म्हणजे त्यांनी ते सर्व पुरावे गुजरातच्या गृह विभागाला पाठवून दिले होते. पुरावे पोहचल्याच्याचं दिवशी अमित शहा यांनी भट्ट यांना फोन करून पुरावे नष्ट करण्यास सांगितले होते. परंतू भट्ट यांनी शहा यांच्या सोबतचे फोन संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह पुन्हा एक अहवाल गृहविभागाला पाठवून दिला होता. यानंतर कैद्यांसोबत अतिमैत्रीपूर्ण संबंध जोपासत असल्याच्या आरोपाखाली भट्ट यांची तेथून बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी अनेक कैद्यांनी भट्ट यांच्या बदलीचा विरोध केला होता. दोन जणांनी तर आपल्या हाताची नस कापून घेतली होती.

संजीव भट्ट यांनी म्हणूनच गुजरात उच्च न्यायालय शपथपत्रात सांगितले होते की, गुजरात दंगे,हरेन पांड्या खून प्रकरणात आपण ऐकले नाही म्हणून आपल्यावर खोटे आरोप लावत फसविण्यात आले आहे. दुसरीकडे गुजरात गुप्त वार्ता विभागात कार्यरत असतांना देखील भट्ट यांनी मोदी यांचे मुस्लीम लोकसंख्या संदर्भातील वादग्रस्त भाषणाचा अहवाल अल्पसंख्यांक आयोगाला पाठविला होता. त्यानंतर त्यांची तेथून बदली करण्यात आली होती. एका अपघातात भट्ट यांच्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. असो…भट्ट यांना वरील कोर्टात न्याय मागण्याचा पर्याय अजून बाकी आहे. परंतू आज एका गोष्टीवर विश्वास बसलाय की… Behind Every Great Fortune There Is a Crime अर्थात प्रत्येक मोठ्या यशामागे एक गुन्हा दडलेला असतो.

 

 

Protected Content