Home Cities रावेर रावेर पीपल्स बँकेच्या अध्यक्षपदी संजय वाणी; उपाध्यक्षपदी मिराबाई राऊत

रावेर पीपल्स बँकेच्या अध्यक्षपदी संजय वाणी; उपाध्यक्षपदी मिराबाई राऊत


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील दि रावेर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी संजय वाणी तर उपाध्यक्षपदी श्रीमती मिराबाई राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे बँकेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील व उपाध्यक्ष राजेश शिंदे यांनी पूर्वनियोजनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर बँकेच्या धनवर्धिनी सभागृहात सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली.

बैठकीदरम्यान अध्यक्षपदासाठी संजय वाणी तर उपाध्यक्षपदासाठी मिराबाई राऊत यांचेच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

या बैठकीला संचालक प्रल्हाद महाजन, सोपान पाटील, सोपान साहेबराव पाटील, मानस कुलकर्णी, राजेंद्र चौधरी, दिलीप पाटील, राजेश शिंदे, पंकज पाटील, अॅड. प्रवीण पाचपोहे, विनोद तायडे, पुष्पाबाई महाजन, दीपिका अग्रवाल, सुनील पाटील तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.

निवड जाहीर होताच उपस्थित संचालक व मान्यवरांनी संजय वाणी आणि मिराबाई राऊत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची भावना नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound