संजय राऊत यांची उद्या धरणगावात सभा !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात आता निवडणूकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत हे धरणगाव येथे असून बुधवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजता प्रचार सभा घेण्यात येणार आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार दौरा सुरू झाला आहे. विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तस तशी निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला आहे. गुलाबराव देवकर हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर प्रचारार्थ संजय राऊत हे धरणगावात येत आहे. या निमित्ताने शहरातील साने पटांगण “शिवनेरी” शिवसेना कार्यालयाजवळ कोट बाजारावरील पटांगणावर भव्यसभेचे आयोजन बुधवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजता करण्यात आले आहे. या सभेला मतदारसंघातील महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content