मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बाहेर पडल्याबरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर पोहचले आहेत. खा.राऊत यांचे उघडपणे पवारांच्या भेटीसाठी आल्यामुळे जबरदस्त चर्चेला उधान आले आहे.
महाराष्ट्रात काल सायंकाळपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज दुपारपासून ‘सिल्व्हर ओक’वर पवार परिवारामध्ये एक बैठक झाली. त्यानंतर अजित पवार हे पत्रकार परिषदसाठी निघाले. त्याच्या थोड्याच वेळानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. दरम्यान, राऊत अचानक पवार यांची भेट घ्यायला का आले? याबाबत एकाच चर्चेला उधान आले आहे. एवढेच नव्हे तर, युती होणार की नाही? याबाबत देखील उस्त्कुता शिगेला ताणली गेली आहे. महारष्ट्रात काही वेगळे समीकरण उदयास येते का? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे.