जामनेर, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटच्या दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांकडून आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे संजय गरूड यांनी आपला उमेदवारी अर्ज समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला. नंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडी कडून सुमित चव्हाण यांंना उमेदवारी मिळाली असून त्यांनीही आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करून शहरात मिरवणूक काढत अर्ज दाखल केला. मनसेचे डॉ. विजयानंद कुळकर्णी यांनी तर संभाजी ब्रिगेडतर्फे अमोल ठोंबरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नंतर बहूजन समाज पार्टीकडूनही अर्ज दाखल करण्यात येण्याचे काम चालू होते. दरम्यान, संजय गरूड यांच्या समर्थन रँलीत जामनेर पाचोरा रोडवर समर्थकांच्या गर्दीत रोडरोलर घुसून चालकाकडून नियंत्रीत न झाल्याने एका जणाच्या पायावरून गेल्याने त्याच्या दोन्ही पायासंह तो इसम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गंभीर इसमाला तात्काळ जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर रोडरोलर चालकाला गर्दीतील जमावाने चोप दिला. लागलीच पोलीस पोहचून त्यांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवत पोलीस स्टेशनला जमा केले.