चाळीसगाव प्रतिनिधी । येथील बी. पी. आर्टस्, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स आणि के.आर. कोतकर ज्यूनीयर कॉलेजमध्ये सॅनेटरी नॅपकीन वेंडीग मशिनचे उदघाटन करण्यात आले.
सॅनेटरी नॅपकीन वेंडीग मशिनचे उदघाटन प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. हेमांगी पूर्णपात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. हे वेंडीग मशीन प्रा.एल.व्ही उपाध्ये यांनी दिलेल्या देणगीतून बसवीण्यात आले. याप्रसंगी डॉ. पूर्णपात्रे म्हणाल्या की महाविद्यालयात येणार्या विद्यार्थीनी साठी अत्यंत गरज असलेले वेंडीग मशीन बसवून महाविद्यालयाने विद्यार्थीनीं प्रती आत्मीयता जोपासली आहे. समारंभाचे अध्यक्ष तथा संस्थेचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुकोदगार काढले.
याप्रसंगी डॉ. एम. बी. पाटील, श्यामलाल कुमावत, प्राचार्य डॉ. मिलींद बिल्दीकर, उपप्राचार्या सौ.सलील पाटील, प्रा.एल.व्ही.उपाध्ये आदींची उपस्थिती आहे. प्रास्तविक प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रा रवींद्र पाटील यांनी मानले.