एरंडोल नगरपालिकातर्फे स्वच्छता मोहीम

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल नगरपालिका मार्फत आज (दि. १५) पासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

नगरसेवक नितिन चौधरी व नगरसेविका बानो बी गुलाब बागवान यांच्या घरापासून त्यांच्या हस्ते करण्यात आली. या मोहिमेत मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय अधिक्षक हितेश जोगी. आरोग्य निरिक्षक अनिल महाजन, देवेंद्र शिंदे, डॉ.अजित भट, विवेक कोळी, विनोद पाटील, भूषण महाजन, महेंद्र पाटील, डॉ.योगेश सुकटे, शिवशंकर ठाकूर, सौरभ बागड, गोसावी, विकास पंचबुध्दे, प्रियंका जैन आदीसह अधिकारी कर्मचारी यानी स्वछता मोहिमेत सहभागी होते. सध्यस्थितीत पावसाळा सुरु असल्यामुळे एरंडोल शहरात साथीचे रोगाचे प्रमाण वाढण्याची नाकारता येत नाही. त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून संपूर्ण शहरातील नाले, गटारी,रस्ते, खुल्या जागा इत्यादीची युध्दीपातळीवर प्रत्येक प्रभागानुसार दर बुधवारी सर्व एकूण १० प्रभागांची साफसफाई करण्याची व वृक्षारोपणांची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.

त्याकरिता नगरपालिकेतील अधिकारी /कर्मचारीची चार टिम करुन कामाचे वाटप करण्यात आलेले आहे. या स्वच्छता मोहिमेत प्रभाग क्र.८ मधील मेन रोड,मुजावर वाडा,पाताळ नगरी भोई गल्ली,भावसार गल्ली, भागातील नाले, गटारी, रस्ते, खुल्या जागेतील परिसरात साफसफाई फवारणी करुन सदर परिसरातील सौदर्यात भर पडण्याकामी यामध्ये ऑक्सिजन देणारी वृक्ष व फळझाडे यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्याकामी एरंडोल नगरपालिका मार्फत लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांचे संगोपन संबंधित भागातील नागरीकानीकरुन न.पा.स सहकार्य करावे.

 

Protected Content