सांगली प्रतिनिधी । जिल्ह्यात कालपासून आज दि. 27 जुलै रोजी सकाळपर्यंत सरासरी 22.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 24.70 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यात सर्वाधिक 82.2 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसाची तालुकानिहाय आकडेवारी जसे मिरज 13.6, जत 2, खानापूर-विटा 14.6, वाळवा-इस्लामपूर 30, तासगाव 11, शिराळा 82.2, आटपाडी झ्र निरंक, कवठे महांकाळ 4.1, पलूस 19.8 व कडेगाव 34. तर वारणा धरणात 24.70 टी.एम.सी. पाणीसाठा आहे. शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 58.67 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.67 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.51 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 12.75 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 7 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे.