चोपडा, प्रतिनिधी | येथील विवेकानंद विद्यालयात आज राष्ट्रीय संग्रहालय परिषद(भारत सरकार),नेहरू विज्ञान केंद्र.वरळी,मुंबई,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य,जिल्हा परिषद व पंचायत समिती चोपडा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०१९ उत्साहात तालुकास्तरावर आयोजित करण्यात आला होता. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक साने गुरुजी विद्यालय, वडती यांनी पटकवला.
नाट्योत्सवात तालुक्यातील एकूण १४ शाळांच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा नाट्यसमूह सहभागी झालेत. जवळपास २१० विद्यार्थ्यांनी या नाट्योत्सवात सहभागी नोद्विला. नाट्योत्सवाची सुरुवात विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व विज्ञानगीत गाऊन केले. त्यांना वाद्यवृंदातील ऑर्गनसाठी विवेक बाविस्कर, कोंगोसाठी तनिष पवन लाठी,देवेश महाजन यांची साथ तर कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मार्गदर्शन लाभले. नाट्योत्सवाचे उद्घाटन केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, केंद्रप्रमुख युवराज पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, नाटयोत्सवाचे परीक्षक व्ही.पी.चौधरी, संजय पाटील,दिनेश बाविस्कर यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र भावे तर मनोगत केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : तालुकास्तरावर प्रथम क्रमांक साने गुरुजी विद्यालय, वडती., द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यालय चोपडा. ,तृतीय क्रमांक प्रताप विद्या मंदिर चोपडा व राजेंद्र माध्यमिक विद्यालय गोरगावले या विद्यालयांनी पटकाविला. सूत्रसंचालन उपशिक्षक राधेशाम पाटील, स्पर्धा सूत्रसंचालन उपशिक्षिका नूतन चौधरी, आभार उपशिक्षिका सरला शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील कलाशिक्षक राकेश विसपुते, विज्ञानशिक्षक सरला शिंदे, नूतन चौधरी,अजय पाटील,राधेश्याम राकेश विसपुते, प्रकाश जाधव,राजू गोसावी आदींनी कामकाज पहिले.