चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकारी पदाचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर निकालामध्ये तालुक्यातील शिरसगाव येथील संदीप लालजी पाटील ( ह. मु.टिटवाळा) यांनी यश संपादन केलेले असून त्यांची उपशिक्षणाधिकारी या पदावर निवड झालेली आहे.
संदीप लालजी पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे सुरुवातीपासूनच संदीप पाटील यांना एमपीएससी परीक्षाबाबत आकर्षण राहिलेले आहे. यापूर्वीही त्यांनी एमपीएससी मार्फत घेण्यात येणार्या बर्याच परीक्षांमध्ये यश संपादन केलेले होते.
संदीप पाटील यांनी बीएससी फिजिक्स या विषयात पदवी घेतल्यानंतर बीएड हा व्यवसायिक अभ्यासक्रमही पूर्ण केलेला आहे. तसेच त्यांनी शिक्षण शास्त्रामध्ये पदवीधर पदवी अर्थात एम ए एज्युकेशन मुंबई विद्यापीठातूनही पूर्ण केलेले आहे आता श्री पाटील हे उपशिक्षणाधिकारी पदाची धुरा सांभाळणारा असून त्यांना ठाणे मुंबई व इतर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परिसरात ते बाबु पाटील म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या या दैदीप्यामान यशाच्या मागे कुटुंबातील सर्व सदस्य तसेच प्रदीप वाबळे आणि निलेश अहिरराव (तळोदे दिगर)या मित्रांचा मोलाचा सहभाग आहे.