अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्तव्यावर असणार्या महिला कंडक्टरला धक्काबुक्की करून मारहाण करणार्याला अमळनेर न्यायालयाने आठ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, ४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे एका महिला वाहकास मारहाणीची घटना घडली होती. या अनुषंगाने सदर महिला कंडक्टरने फिर्याद दिली होती. यात त्यांनी म्हटले होते की, त्या त्यांच्या कर्तव्यावर असताना त्यांना दिनांक ०४.०१.२०२२ रोजी अडावद पिंप्री या बस वर नेमनुक
करण्यात आली होती. त्या अडावद बस स्थानकातुन सकाळी ११.१० वाजता बस क्रमांक एम.एच.२० बि.एल १४०६ यावरील चालक नशीर बशीर शेख यांचे सह पिंप्री गांवी जाण्याकरीता प्रवासी घेवुन निघाल्या होत्या.
दरम्यान, संबंधीत बस कमळगाव येथे असताना फिर्यादी हया एका इसमाजवळ टिकीट बुकींग साठी गेल्या तेंव्हा तो इसम त्यांचे मोबाईलवर गाणे मोठया आवाजाने वाजवत होता. तेंव्हा फिर्यादी यांनी त्यांस तिकीटाबाबत विचारणा केली याप्रसंगी त्याने हुज्जत घातली. यानंतर बस साडेअकराच्या सुमारास तो कमळगाव बस बसस्थानकावर आल्यानंतर उतरण्याच्या वेळेस फिर्यादी या बसच्या दरवाज्या जवळ उभ्या असतना आरोपी रतीक जुलाल बागूल ( वय २३, रा. कमळगाव, ता. चोपडा ) याने मागुन येवुन फिर्यादीस जोरात धक्का देवुनल बस खली ढकलेले. त्यामुळे फिर्यादी हया बसच्या खाली जावुन पडल्या व त्यानंतर आरोपी यांने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व फिर्यादी यांचे कानाखाली मारले हा प्रकार पाहुन बस वरील चालक नसिक शेख हे बसच्या खाली उतरुन आले व आरोपी यांस विचारणा केली की तुरू फिर्यादी बस वाहक यांना का मारले याचा राग येवुन आरोपी याने चालकास देखील मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावरून फिर्यादीने आरोपी विरुध्द वर नमुद कलमा प्रमाणे अडावद,पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. सदर खटला अमळनेर न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश १ पी. आर. चौधरी यांच्यापुढे चालला. यात सहायक सरकारी वकील म्हणून के. आर. बागूल यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. यात पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत बुधा पाटील यांची साक्ष देखील घेण्यात आली. या खटल्यात न्यायमूर्तींनी संशयित रतीक जुलाल बागूल ( वय २३, रा. कमळगाव, ता. चोपडा ) याला भादंवि कलम ३३२ अन्वये आठ महिन्यांची शिक्षा; कलम ३५३ अंतर्गत आठ महिन्यांची शिक्षा ठोठावली. या शिक्षा त्याला एकत्रीतपणे भोगावयाच्या आहेत.
या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार उदयसिंह साळुंखे; हेकॉ हिरालाल पाटील, कर्मचारी अतुल पाटील राहूल रणधीर, नितीन कापडणे आदींसह सहकार्य केले.