Home क्राईम चंदन लाकडाची तस्करी करणारे अटकेत

चंदन लाकडाची तस्करी करणारे अटकेत

0
56

यावल प्रतिनिधी । जिल्हा गुन्हा शाखेच्या पथकाने चंदनाच्या लाकडाची तस्करी करणार्‍यांना अटक केली आहे.

रावेर तालुक्यातील निंबोल येथे विजया बँकेत शिरलेल्या दोघांनी सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना जिल्हा गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या उतारूंकडे हत्यारे व हातबॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी दुबराज छोटेलाल पारधी (वय ५०) व रतदीपलाल दुबराज पारधी वय २८ (दोन्ही रा. ग्राम हरदुबा, ता. रेटी, जि. कटनी, मध्यप्रदेश) यांंना पोलिसांनी ताब्यात घेतलेे. त्यांच्याकडे ११ किलो ५५८ ग्रॅम चंदनाचे लाकूड सापडले. यामुळे त्यांना अटक करून हा गुन्हा वन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound