कोळन्हावी येथे तापी पात्रात जप्त केलेल्या वाळूचा चार लाखात लिलाव

fr016

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील कोळन्हावी परिसरातील तापी नदीच्या पात्रात महसुल प्रशासनाने अवैध वाळुचा उपसा व वाहतुक करणाऱ्यांविरूध्द राबवलेल्या धडक मोहीमेत जप्त करण्यात आलेल्या वाळुचा चार लाखात जाहीर लिलाव करण्यात आला आहे.

 

या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार भागील आठवडयात कोळन्हावी शिवारातील तापी नदीच्या पात्रात मोठया प्रमाणात अनधिकृतपणे वाळु माफीयाकडुन वाळुचा उपसा करण्यात येत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून तापी नदीच्या पात्रात जावुन कारवाई केली होती. यावेळी वाळु माफीया पळवुन जाण्यात यशस्वी झाले होते. या कारवाईदरम्यान तापी नदीच्या पात्रात आणि परिसरात उपसा केलेल्या वाळुचे साठे महसुल प्रशासनाकडून जप्त करण्यात आले होते. त्या  ११० ब्रास वाळुचा फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या आदेशान्वये जाहीर लिलाव करण्यात आला. यात स्थानिक नागरिक अण्णा निवृत्ती साळुंके यांनी बोली लावुन ४ लाख २३ हजार रुपयांमध्ये वाळु खरेदी केली आहे. महसुल प्रशासनाव्दारे अशा पद्धतीने वाळु माफीयाच्या विरूद्ध करण्यात आलेली ही आता पर्यंतची पहीलीच कारवाई असल्याने महसुल प्रशासनाच्या कारवाईने संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. महसुल विभागाने विविध वाहनांवर आतापर्यंत केलेल्या दंडात्मक कारवाईत २० लाखांवर महसुल वसुल केल्याने वाळु माफीयांवर चांगलाच वचक बसला आहे.

Protected Content